पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघ, मुंबई
संस्थेची ध्येय व उदिष्टे
प्रिय बंधु व भगिनी यांस.
पुणे जिल्हातील ग्रामीण भागातील धंदा, व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने उदरनिर्वाहासाठी मुंबई ठाणे व नवी मुंबई, उपनगरात अनेक कुटुंब राहत आहे. त्या सर्वांना एकत्र करून भविष्यात येणाऱ्या अडी-अडचणींना मदत करता यावी तसेच त्यांच्या समस्यांचे निवारण करता यावे, म्हणून सन १९९० साली काही फुलवाले बांधवांनी 'पुणे जिल्हा फुलवाले रहिवाशी सेवा संघ मुंबई' या संस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हा पासून प्रायोजिक तत्वावर संस्थेचे काम सुरु होते. १ जानेवारी २००६ रोजी संस्थेला शासकीय परवानगी मिळाली. संस्था रजिस्टर करण्यात आली. संस्थेत अनेक प्रकारचे व्यावसायिक, फुलवाले, फळांचे व्यापारी, नोकरदार वर्ग, उद्योजक या सर्वांना संस्थेत सामावून घेण्यासाठी सर्व सदस्य, सर्वसाधारण सभासद, हितचिंतक यांचे संमतीने नावात दि.२५ सप्टेंबर २०१४ रोजी दुरुस्ती करण्यात आली. संस्था भविष्यात 'पुणे जिल्हा रहिवाशी संघ, मुंबई' या नावाने संबोधण्यात येऊ लागली व सामाजिक कार्य करु लागली.
पुणे जिल्ह्यातील मुंबईमधील सर्व बंधू व महिला भगिनींना एकत्र करणे ही काळाची गरज आहे. आपण सर्व एकत्र आले पाहिजे.
तरुण पिढीला उच्च शिक्षण राज्यातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहीत करुन त्यांना व्यसनापासून मुक्त करुन त्यांच्च्यात देश भक्ती रुजविणे.
सामाजिक कार्य, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबविणे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी व उद्योग धंदयासाठी मदत करणे.
विद्यार्थी मुला-मुलींना शिक्षणात प्रोत्साहीत करण्यासाठी गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे आयोजन करणे.
महिलांना मोठ्या प्रमाणात एकत्र करुन सामाजिक कार्यक्रमात सहभागी करुन त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यास शक्यतो मदत करणे. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम राबविणे. जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणे.
पुणे जिल्ह्यातील मुला-मुलींचे विवाह जुळविण्यास मदत व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने नवीन कार्यकारणी संचालिकांनी सन २०२१ पासून वधु-वर सुचक समिती सुरु करण्यात आली. सदर सेवा ही विनामुल्य असून याचा पुणेकरांनी लाभ घ्यावा.